शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
2
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
3
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
6
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
7
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
8
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
9
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
10
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
11
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
12
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
13
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
14
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
15
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
16
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
19
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
20
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर अवघ्या दीड तासातच पुत्ररत्न

By admin | Updated: December 10, 2014 23:04 IST

‘लग्नानंतर अवघ्या दीड तासात पुत्ररत्न’ वाचून खरे वाटत नाही ना ? मात्र हे सत्य आहे. नेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ९ वाजता एका मंदिरात प्रेमप्रकरणातून विवाह पार पडला.

प्रेमविवाह : दोनही परिवारांनी दिला सामंजस्याचा परिचय
पांडुरंग भोयर - सोनखास
‘लग्नानंतर अवघ्या दीड तासात पुत्ररत्न’ वाचून खरे वाटत नाही ना ? मात्र हे सत्य आहे. नेर तालुक्यातील एका गावात मंगळवारी रात्री ९ वाजता एका मंदिरात प्रेमप्रकरणातून विवाह पार पडला. मंगलाष्टके आटोपत नाही तोच नववधूला प्रसवकळा सुरू झाल्या आणि अवघ्या दीड तासातच पुत्ररत्न प्राप्त झाले. लग्न आणि बाळंतपण एकाच दिवशी असा अनोखा प्रसंग या गावकऱ्यांनी अनुभवला.
एका तरुणाचे घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम जडले. प्रेमात जगण्या मरण्याच्या आनाभाका घेतल्या. जवळीकता वाढत गेली आणि जे होऊ नये तेच झाले. तरुणी गर्भवती राहिली. मात्र हा प्रकार तिने कुणालाही सांगितला नाही. मात्र काही दिवसातच घरच्यांच्या हा प्रकार लक्षात आला. तिला याबाबत विचारणा केली. मात्र ती एक शब्दही बोलायला तयार नव्हती. कुणाचेही नाव घेत नव्हती. घरच्या मंडळींनी विनवणी करण्यात दोन-तीन महिने गेले. तोपर्यंत ती सहा महिन्याची गर्भवती झाली. आता गावात आपली बदनामी होईल या भीतीतून तिने घरच्यांना आपल्या प्रियकराचे नाव सांगितले. घरच्यांनी नातेवाईकांना बोलावून काय करता येईल यावर चर्चा केली. लग्नाशिवाय कोणताच पर्याय नाही, असा सल्ला नातेवाईकांनी दिला. त्यावरून त्या तरुणाच्या नातेवाईकांची भेट घेतली. सुरुवातीला या तरुणाने आडेवेढे घेतले. या प्रकारात सदर तरुणीचे दिवस भरत आले होते. लग्नासाठी एकदाचा तो तरुण तयार झाला. यानंतर गावातीलच मंदिरात मंगळवारी लग्न करण्याचे ठरले. दोनही कडील मोजक्या पाहुण्या मंडळींच्या उपस्थितीत रात्री ९ वाजता साध्या पद्धतीने हार टाकून विवाह पार पडला. वरात घरी गेली. काही वेळातच नववधुला प्रसवकळा सुरू झाल्या. त्यामुळे ती शेजारी असलेल्या आपल्या आईच्या घरी गेली आणि तेथे रात्री १०.३० वाजता बाळंत होऊन पुत्ररत्न प्राप्त झाले. लग्न आणि बाळंतपण एकाच दिवशी तेही अवघ्या दीड तासाच्या अंतराने होण्याची ही घटना यवतमाळ-नेर मार्गावरील त्या गावाने अनुभवली. दोनही परिवाराने सामंजस्य दाखविल्याने दोन प्रेमीजीव एकत्र आले आणि संसारवेलीवर एक फुलही उमलले. मात्र या घटनेची चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.