शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

हैदराबाद ‘एन्काऊंटर’नंतर यवतमाळात आनंदाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 6:00 AM

कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, तर एन्काउंटर करण्याची वेळच आली नसती.

ठळक मुद्देयवतमाळच्या तरुणाईची भावना : बलात्कारासारखे घृणास्पद कृत्य करणाऱ्या नराधमांना असेच ‘ठोकले’ पाहिजे...

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलिसांनी गुन्हेगारांना पकडायचे... मग वकिलांनी कायद्याचा किस पाडून गुन्हेगारांना सोडवायचे.. किती दिवस चालायचे हे? त्यापेक्षा बलात्कारासारखे घृणास्पद गुन्हे करणाऱ्यांना असेच रस्त्यावर पळवून ‘ठोकले’ पाहिजे. सीमेबाहेरून देशाविरुद्ध काम करणाऱ्यांना सरकारने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून मारले. हैदराबादच्या पोलिसांनी देशात राहून देशाच्या सभ्येतला गालबोट लावणाऱ्यांना संपविले. हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता, पण तो इंटरनल, टेक्निकल स्ट्राईक होता...यवतमाळातील तरुणाईच्या शब्दांना धार चढली होती. हैदराबादमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला क्रूरपणे मारण्यात आले. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी देशभरातून होत असतानाच यवतमाळकरांची जनभावनाही भडकली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी यातील चारही आरोपींना पोलिसांनी एन्काउंटर करून यमसदनी धाडले. ही वार्ता यवतमाळात धडकताच तरुणाईने आपल्या आनंदाला वाट मोकळी करून दिली.‘आज छत्रपती शिवाजी महाराज असते, तर त्यांनीही अशा नराधमांना कापूनच काढले असते’ सळसळत्या तरुणाईचे हे उद्गार आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना अशाच शिक्षा दिल्या जात होत्या. दुष्कृत्य करणाऱ्यांना पोलिसांनी अद्दल घडवायची नाही तर काय, जेलमध्ये त्यांची बडदास्त ठेवायची काय? कायद्याचा धाकच उरला नसेल, तर बंदूकीने ‘ठोकणे’ हाच उपाय आहे... पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणाचे हे मत आगामी काळात गुन्हेगारांच्या मनात धडकी भरविणारे आहे.जोपर्यंत आपल्या देशात आसाराम, रामरहीमसारखे भोंदू आहेत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही, असा संतापही तरुणांनी व्यक्त केला. गुन्हेगारांना जेलमध्ये वर्षानुवर्षे सडवत ठेवण्यापेक्षा त्यांना एका झटक्यात जगाच्या पलिकडे पाठविले पाहिजे.पण तरुणाई म्हणजे, आले मनात तर बोलले क्षणात असेही कोणी म्हणण्याचे कारण नाही. कारण काही तरुणांच्या प्रतिक्रिया अत्यंत संयमितही आहेत. ते म्हणाले, आरोपींचा एन्काउंटर झाला हे चांगलेच झाले. पण साऱ्या गोष्टी कायद्याने झालेल्या कधीही चांगल्या असतात.कायद्याचा विद्यार्थी असलेला एक तरुण म्हणाला, आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत एखाद्याला मारून टाकण्याचा अधिकार कोणालाही नाही. नाहीतर पोलीस कोणालाही डोळे मिटून मारून टाकतील. हैदराबादमधील बलात्काराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात होती. पोलिसांकडे पुरावे असते, तर एन्काउंटर करण्याची वेळच आली नसती.तरुणांनी केले मनमोकळेहैदराबादमधील एन्काऊंटरच्या निमित्ताने यवतमाळातील स्वप्नील शेंडे, रूपेश सोनटक्के, राहुल वानखेडे, सागर ढोरे, प्रज्वल मोरघडे, बुद्धराज दुपारे आदी तरुणांनी ‘लोकमत’कडे आपली मते दिलखुलास मांडली.

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरण