७० वर्षांनंतर देवधरीत एसटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:06 IST2018-07-27T22:05:56+5:302018-07-27T22:06:19+5:30
तालुक्यातील देवधरी येथे स्वातंत्र्याच्या तब्बल ७0 वर्षांनंतर महामंडळाची बस पोहोचली. यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

७० वर्षांनंतर देवधरीत एसटी बस
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यातील देवधरी येथे स्वातंत्र्याच्या तब्बल ७0 वर्षांनंतर महामंडळाची बस पोहोचली. यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
घाटंजी येथून जेमतेत २0 किलोमीटर अंतावर देवधरी हे गाव आहे. पारवा येथून हे गाव केवळ सात किलोमीटर आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ७0 वर्षांनंतरही या गावात एसटी बस पोहोचली नव्हती. दोन हजारांच्यावर लोकसंख्या असलेल्या देवधरी गावातील ग्रामस्थांना बसचे दर्शन झाले नव्हते. गावकºयांनी अनेकदा बस सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना साकडे घातले. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
आता जिल्हा परिषद सदस्य पावणी रुपेश कल्यमवार यांनी गावकºयांची व विशेषत: विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेऊन एसटी बस सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. पांढरकवडा आगार प्रमुखांना पत्र दिले. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर महामंडळाने देवधरीसाठी बस सुरू केली. पहिली बस गावात येताच गावकरी व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
दशवधरी येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता घाटंजी येथे किंवा डोर्ली येथे जावे लागते. बसची सुविधघ नसल्याने ते पायदळ अथवा आॅटोने प्रवास करीत होते. गावकºयांनाही तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. आता बसची सुविधा झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले. गावकºयांनी जिल्हा परिषद सदस्य पावणी कल्यमवार यांचे त्यांनी आभार मानले.