शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त मोहिमेत प्रशासकीय अडसर

By admin | Updated: May 22, 2014 01:34 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविताना प्रशासकीय उणिवा अडसर

पुसद : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविताना प्रशासकीय उणिवा अडसर ठरत असून यामुळे तंटामुक्त गाव समितीला अडचणींना तोंड द्यावे लागते. या उणिवा दूर केल्यास तंटामुक्त गाव योजना प्रभावीपणे राबविली जाऊ शकते.

तंटामुक्त गाव मोहीम राबविताना गावकर्‍यासमोर मोठी समस्या असते ती दारूबंद करण्याची. बहुतांश गावातील तंटे हे दारूमुळेच होतात. अनधिकृत दारू विक्री कायमस्वरूपी बंद करता येईल. परंतु परवाना प्राप्त दारू दुकान बंद करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. ५0 टक्के महिलांनी ग्रामसभेतून दारू बंदी करण्याचा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवावा लागतो. महिलांचा पुढाकार, मतदान त्यानंतर कुठे दारूबंदीसाठी शासन हालचाल सुरू करते. हातभट्टी व गावठी दारू बंद करण्यातही पोलिसांचे पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही. गावागावात दारू विकली जात असताना पोलीस मात्र त्यांच्यावर कारवाईच करीत नाही. जोपर्यंत गावात दारूबंदी होत नाही. तोपर्यंत गावातील भांडणतंटे बंद होणार नाही आणि ही योजना प्रभावीपणे राबविली जाणार नाही.

गावातील काही तंटे रस्ते, नाल्या, बांध, अतिक्रमण यावरून होतात. नागरिक जेवढे जबाबदार आहे तेवढेच स्थानिक ग्रामपंचायतही जबाबदार असते. ग्रामपंचायतीच्या हद्दीचे नकाशे, रस्त्याचे नकाशे, लोकांच्या जागेच्या नकाशे, मिळकतीचे दस्ताऐवज, वेळोवेळी खरेदी विक्रीच्या नोंदी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्धच होत नाही.

त्यामुळे अतिक्रमण वाढते आणि यातून भांडण तंटे सुरू होतात. बहुतांश महसुली आणि दिवाणे तंटे शेताच्या रस्त्यावरून, धुर्‍यावरून, शेतमोजणीवरून होताना दिसतात. या प्रकारात प्रशासकीय उणिवाच अधिक कारणीभूत आहे. शेताची मोजणी दर तीन वर्षाने होऊन प्रत्येक शेतकर्‍याच्या सातबाराप्रमाणे जमिनीची हद्द कायम करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. परंतु ब्रिटीशकाळात १९३0 सालात मोजलेल्या शेतमोजणीनंतर जमिनीची मोजणीच झाली नाही. त्यामुळे मोजणीच्या खुणा दिसत नाही. अभिलेख मोजणी निरीक्षकाच्या मोजणीमध्येही त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. त्याचा परिणाम दिवाणी आणि महसुली तंट्यात होतो. वादात अनेकदा हाणामारी होते. महसूल विभागाने या योजनेतील त्रुट्या दूर करून मोजणीसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. प्रशासकीय अडसर दूर झाल्यास तंटामुक्त गाव मोहीम प्रभावीपणे राबविता येऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)