'आदिवासी विकास'च्या अपर आयुक्तांचे केले 'डिमोशन'; नागपूरच्या एटीसींकडे प्रभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:14 IST2026-01-02T14:12:21+5:302026-01-02T14:14:08+5:30

नागपूरच्या एटीसींकडे प्रभार : नाशिक एसटी प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सह आयुक्तपदावर बदली, गाजले होते धारणीचे प्रकरण

Additional Commissioner of 'Tribal Development' demoted; Nagpur ATC takes charge | 'आदिवासी विकास'च्या अपर आयुक्तांचे केले 'डिमोशन'; नागपूरच्या एटीसींकडे प्रभार

Additional Commissioner of 'Tribal Development' demoted; Nagpur ATC takes charge

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
पुसद प्रकल्पातील भोजन कंत्राट निविदेमुळे अमरावती अपर आयुक्त कार्यालय चर्चेत आले होते. तसेच अमरावती जिल्ह्यातील धारणी प्रकल्पातील अंडी देयकाचे प्रकरणही चांगलेच गाजले. अशातच अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांची नाशिक येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या सह आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे. अपर आयुक्त ते सह आयुक्त या 'डिमोशन'ची चर्चा आदिवासी विकास विभागात चांगलीच रंगली आहे.

आदिवासी विकास विभागाने ३१ डिसेंबर रोजी बदलीचे आदेश काढले असून, अमरावती अपर आयुक्त पदाचा प्रभार अतिरिक्त स्वरूपात नागपूरचे एटीसी आयएएस आयुषी सिंह यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. आदेशात जितेंद्र चौधरी यांचे पद अवनत करून (डिमोशन) बदली करण्यात येत असल्याचे स्पष्ट नमूद आहे. अमरावती विभागांतर्गत एकूण सात प्रकल्प कार्यालये येतात. त्यामध्ये पांढरकवडा, पुसद, धारणी, कळमनुरी, अकोला, छत्रपती संभाजीनगर, किनवटचा समावेश आहे. पुसद प्रकल्पातील भोजन पुरवठा निविदेत बोगस अनुभव प्रमाणपत्र सादर केलेले असतानाही मंजुरी देण्यात आली होती. तसेच शासनाकडे प्रस्ताव पाठवून प्रशासकीय मान्यता घेण्यात आली होती.

हा प्रकार 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणल्यानंतर प्रशासकीय मान्यता रद्द करून संस्थाचालकावर फौजदारी कारवाई करण्यात आली. धारणी प्रकल्पातील अंडी देयकेही वादाचा विषय ठरला आहे. त्याचवेळी शासनाने एटीसींचे पद अवनत करून त्यांना सह आयुक्तपदावर बदली दिल्याने या मागे पुसद, धारणीची प्रकरणेच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. अपर आयुक्तपदाचा प्रभार नागपूरच्या आयएएस दर्जाच्या एटीसींकडे देण्यात आला असला तरी अमरावतीत कुणाची नियुक्ती केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपूरच्या अधिकाऱ्याचे पद अवनत, अमरावतीच्या उपायुक्तांना प्रमोशन

  • अमरावतीच्या अपर आयुक्तांपाठोपाठ नागपूर विभागातील वरिष्ठ संशोधन अधिकारी श्रीकांत धोटे यांचेही पद अवनत अर्थात डिमोशन करण्यात आले आहे. त्यांची अमरावती अपर आयुक्त कार्यालयात उपायुक्तपदावर बदली करण्यात आली आहे.
  • अमरावतीच्या उपायुक्त जागृती २ कुमरे यांचे पद उन्नत (प्रमोशन) करण्यात आले आहे. त्यांची चिमूर प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
  • अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे, असे आदेश आदिवासी विकास विभागाचे कार्यासन अधिकारी अजय साखरे यांनी दिले आहे.


 

Web Title : आदिवासी विकास आयुक्त का पदावनत; नागपुर एटीसी को अतिरिक्त प्रभार

Web Summary : अमरावती के अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त जितेंद्र चौधरी को भोजन अनुबंध और अंडे के भुगतान विवाद के बीच पदावनत किया गया। नागपुर की आयुषी सिंह को अतिरिक्त प्रभार। आदिवासी विकास परियोजनाओं में अनियमितताओं के लिए अधिकारियों पर कार्रवाई।

Web Title : Tribal Development Commissioner Demoted; Nagpur ATC Gets Additional Charge

Web Summary : Amravati's Additional Tribal Development Commissioner Jitendra Choudhary was demoted amid controversy over food contracts and egg payments. Nagpur's Ayushi Singh assumes additional charge. Officials face consequences for irregularities in tribal development projects.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.