मारेगावात नियम न पाळल्यानेच वाढताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:18+5:30

शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे.

Accidents are only increasing due to non-compliance in Maregaon | मारेगावात नियम न पाळल्यानेच वाढताहेत अपघात

मारेगावात नियम न पाळल्यानेच वाढताहेत अपघात

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । वाहतूक शाखेच्या कारवाईची गरज, मद्यपान करून वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले

देवेंद्र पोल्हे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : शहरातील रस्त्यांवर व ग्रामीण भागात धावणाऱ्या अनेक वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. या वाहनचालकांत अप्रशिक्षीत अल्पवयीन मुले, मद्यपी आणी ंविनापरवानाधारक यांचा सहभाग मोठा आहे. मद्यपान करून वेगात वाहने चालविणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणे, अशा वाहनचालकांवर आवश्यक त्या प्रमाणात कार्यवाही होत नसल्याने वाहतुकीचे नियम पायदळी तुडविण्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरातील रस्त्यावर वाहतुकीच्या नियमाची पायमल्ली होतानाचे चित्र दररोज दृष्टीस पडते. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. आपण नियम तोडले तर आपल्यावर कायदेशीर कार्यवाही होते, ही भावनाच आता सर्वसामान्यातून लोप पावत चालली आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा बोथट बनली आहे. वणी उपविभागात मारेगाव तालुक्यात अपघाताचे प्रमाण जास्त आहे. सातत्याने अपघात होऊन अनेकांचे प्राण जात आहेत. बºयाच अपघातात मद्यपान करून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणे, ही कारणे सातत्याने समोर येत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर दिवसभर शहरात पदोपदी वाहतूक नियम तोडले जात आहेत. अपघात घडून मृत्यू झाल्यावर यंत्रणेपासून सर्वजण हळहळ व्यक्त करतात. परंतु अपघाताची जबाबदारी कोणीच स्विकारायला तयार नाही. वाहनधारकांना आणि नागरिकांना यंत्रणेला दोष देऊन प्रत्येकजण आपली जबाबदारी दुसऱ्यांवर झटकत असल्याचे चित्र मारेगावात पहायला मिळते.

कारवाईत सातत्य नाही
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरूद्ध सातत्याने कार्यवाही होताना दिसत नाही. केवळ उद्दीष्टपूर्तीसाठी कार्यवाहीचे सोपस्कार पार पाडले जाते. त्यामुळे रस्त्यावर प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस एखादेवेळी कार्यवाही करताना दिसतात. त्यावेळी रोडच्या दोनही बाजुला कार्यवाहीच्या भितीने वाहनचालकांच्या रांगा लागलेल्या असतात. नागरिकांनाही जबाबदारीची जाणिव नाही. वाहने वाहतुकीचे नियम सांभाळून चालविल्यास निम्म्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. परंतु नागरिक मात्र एवढी तसदी घेण्यासही तयार नसल्याचे दिसून येते. पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष आहे.

पोलिसांचे आवाहन
आपल्या वाहनामुळे अपघात घडेल, असे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. अल्पवयीन व परवाना नसलेल्या मुलांच्या हातात पालकांनी वाहने देऊ नये, मद्यपान करून वाहने चालवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तालुक्यात अपघात घडल्यास कारणीभूत ठरणाºयाविरूद्ध कडक कारवाई केली जाईल, कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असे ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Accidents are only increasing due to non-compliance in Maregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात