माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; सहा जण जखमी
By सुरेंद्र राऊत | Updated: September 29, 2022 16:26 IST2022-09-29T16:25:14+5:302022-09-29T16:26:40+5:30
सर्व जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; सहा जण जखमी
यवतमाळ : माहूर येथे दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. ही घटना बाभूळगाव तालुक्यातील गळवा येथे घडली. यात सहा जण जखमी झाले. सर्व जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना गुरुवारी दुपारी घडली. वाई हातोला येथील भाविक वाहनाने माहूर जात होते. गळवा गावाजवळ वाहनाचे पट्टे तुटले. त्यामुळे अनियंत्रित होवून अपघात घडला. यात अंजली दमडू पवार (१७), कीर्ती सुधाकर आडे (१८), प्राची गणेश पवार (१७), रिना राजू आडे (१७), वृषभ प्रवीण चव्हाण (१५), नीलेश तोडराम पवार (३५) हे किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या अपघातात कुठलीही हानी झाली नाही.