शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग; सुदैवाने २५ मजूर बचावले, कापूस, सरकी खाक

By रवींद्र चांदेकर | Published: January 04, 2024 9:36 PM

कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली.

वणी (यवतमाळ): निळापूर-ब्राह्मणी रोडवरील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला आग लागून, अंदाजे दोन ते अडीच हजार क्विंटल कापूस व सरकी जळाली. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी काम करीत असलेल्या २५ मजुरांचे प्राण सुदैवाने वाचले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

कापसाचे व्यापारी आरिफ अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जिनिंग-प्रेसिंगला गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. त्यावेळी २५ मजूर फॅक्टरीत काम करीत होते. सुदैवाने या सर्वांचे प्राण वाचले. फॅक्टरीमध्ये जिनिंग प्रेसिंगचे काम ५६ स्पिन मशीनवर सुरू होते. कापूस वाहक पट्ट्यावर घर्षण होऊन ठिणगी उडाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन हजार क्विंटल कापूस, एक हजार क्विंटल सरकी  आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारी  विमा कंपनी सर्वेक्षणासाठी दाखल होणार आहे, अशी माहिती जीन मालकांनी दिली. घटनास्थळी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमधून प्रचंड प्रमाणात धूर निघत होता. आग विझवण्याचे काम नगरपरिषदेचा एक बंब करीत होता. राजा एक्जीन जिनिंग-प्रेसिंग  हे तालुक्यातील सर्वांत मोठे युनिट आहे. याठिकाणी दररोज दोन  हजार क्विंटलहून अधिक कापसाची खरेदी करण्यात आली होती.

कापसाची आवक वाढली; धोकाही वाढतोय   वणी येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस येतो. लगतच्या तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यातीलही काही गावांमधील शेतकरी वणी येथे कापूस विक्रीला आणतात. यातून येथे जिनिंग व प्रेसिंगचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. शहराच्या बाहेर जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर जिनिंग-प्रेसिंग आहे. याच परिसरातून मोठ्या वाहनांद्वारे कोळशाची वाहतूक केली जाते. त्यामुळे अ

टॅग्स :Yavatmalयवतमाळfireआगwani-acवणीFire Brigadeअग्निशमन दल