धावत्या मिनीबसने अचानक घेतला पेट ! अग्निशमन येईपर्यंत बस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 17:15 IST2026-03-21T17:13:49+5:302026-03-21T17:15:25+5:30
Yavatmal : वर्धा येथून हॅप्पी क्लबचे १७ सदस्य नांदेड जाण्यासाठी शनिवारी निघाले, यवतमाळ शहरालगत दुपारी २ वाजता जवाहरलाल दर्डा विमानतळाजवळ अचानक मिनिबस मध्ये (क्रं. एमएच २७/००५९) जळल्याचा वास आल्याने चालकाने वाहन थांबिवले.

A running minibus suddenly caught fire! The bus was completely burnt out by the time the fire brigade arrived.
यवतमाळ : वर्धा येथून हॅप्पी क्लबचे १७ सदस्य नांदेड जाण्यासाठी शनिवारी निघाले, यवतमाळ शहरालगत दुपारी २ वाजता जवाहरलाल दर्डा विमानतळाजवळ अचानक मिनिबस मध्ये (क्रं. एमएच २७/००५९) जळल्याचा वास आल्याने चालकाने वाहन थांबिवले. बाॅनेट उघड बघितले असता रबरी पाईप जळताना दिसला.
बाजूच्या हाॅटेल मधून पाणी आणण्यासाठी चालक गेला, ताे परत येईपर्यंत संपूर्ण मिनिबसने पेट घेतला हाेता. चालकासाेबतच १७ प्रवासी उतरल्याने काेणती हानी झाली नाही. अग्निशमन बंब येईपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली.