शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

९४ हजार गरजवंतांकडे रेशन कार्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के नागरिकांना मोफत धान्य मिळाले. अद्याप २८ टक्के नागरिक धान्याच्या प्रतीक्षेत आहे.

ठळक मुद्देमोफत धान्यासाठी दात्यांची प्रतीक्षा : लॉकडाऊन वाढल्याने २४ हजार कुटुंबांपुढील चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गरजवंतांना रेशन दुकानांमधून नियमित धान्यासोबत मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. यानंतरही २४ हजार कुटुंबातील ९४ हजार नागरिकांना धान्य मिळालेच नाही. यामुळे वाढत्या लॉकडाऊनसोबत त्यांना दोन घासाची चिंता पडली आहे.रेशन दुकानांमधून धान्य वितरित करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. यानंतर तीन महिन्याचा कोटा मंजूर झाला. मनुष्यबळाचा अभाव आणि वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणीमुळे पुरवठा विस्कळीत झाला. अखेर धान्य पोहोचले. ९५ टक्के नागरिकांना नियमित धान्य मिळाले. तर ७२ टक्के नागरिकांना मोफत धान्य मिळाले. अद्याप २८ टक्के नागरिक धान्याच्या प्रतीक्षेत आहे. यासोबतच २४ हजार ४२ कुटुंब रेशन कार्ड नसल्याने अपात्र ठरले आहे. या नागरिकांना धान्याची नितांत गरज आहे. मात्र अजूनही त्यांच्यासाठी उपाययोजना झाल्या नाही. यामुळे पुढील काळात घर कसे चालवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला आहे.जिल्ह्यात एक लाख ३३ हजार १९० क्ंिवटल धान्य नियमित स्वरूपात दुकानांमधून वितरित करण्यात येते. यासोबतच दोन लाख ४५ हजार २६० क्ंिवटल धान्य अतिरिक्त स्वरुपात उचल करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य जिल्ह्यात आणताना यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली आहे. असे असले तरी रेशन न मिळालेल्या २४ हजार कुटुंबांचा रोष पुरवठा विभागावर कायम आहे. २४ हजार कुटुंबातील ९१ हजार ८५४ नागरिकांंना धान्य हवे आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णयाची गरज आहे.साखर आली, पण डाळीचे काय ?स्वस्त धान्य दुकानातून तांदूळ आणि गहू वितरित करण्यात येते. यासोबतच साखर आणि डाळ वितरित केली जाते. कोरोनाच्या साथरोगानंतर जिल्ह््याची डाळ आलीच नाही. साखरेसाठी अनेक पत्रव्यवहारानंतर उपलब्धतेची मान्यता मिळाली आहे. आता ही साखर पुढील महिन्यात अंत्योदय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. एका कुटुंबासाठी एक किलो साखर या दराने ही साखर ग्राहकांना २० रुपये दराने मिळणार आहे. याच सुमारास डाळीचे दर गगणाला भिडले आहे. सर्वसामान्य नागरिकांना तूरडाळ मिळावी अशी अपेक्षा आहे. यापूर्वी डाळ मिळाली होती. आता अडचणीतच डाळ न मिळाल्याने नागरिकांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस