शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

जिल्ह्यातील 83 जणांची कोरोनावर मात; दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 7:53 PM

90 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर

यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 83 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 90 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.

मृत झालेल्या दोन जणांमध्ये दारव्हा शहरातील 86 वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील 84 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 90 जणांमध्ये 49 पुरुष आणि 41 महिला आहेत. यात पुसद शहरातील नऊ पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील तीन पुरुष व एक महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, आर्णि शहरातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व दहा महिला, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील चार पुरुष, यवतमाळ शहरातील 10 पुरुष व 12 महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व चार महिला पॉझेटिव्ह आले आहेत.  

सद्यस्थितीत जिल्ह्यात 649 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 232 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2915 झाली आहे. यापैकी 1964 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 70 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 190 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने बुधवारी 345 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 44851 नमुने पाठविले असून यापैकी 43282 प्राप्त तर 1569 अप्राप्त आहेत. तसेच 40367 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ