शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यात तीन वर्षांत ८२ बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात ती घेतली जात नाही. जन्मानंतर बाळाला उबदार वातावरणाची गरज असते.

ठळक मुद्देविविध कारणे : चालू आर्थिक वर्षात मात्र बालमृत्यूचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यात गेल्या तीन वर्षांमध्ये शून्य ते एक वर्षे वयोगटातील ८५ बालमृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक ३२ बालमृत्यू सन २०१७-१८ मध्ये झाले आहेत.वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात ती घेतली जात नाही. जन्मानंतर बाळाला उबदार वातावरणाची गरज असते. मात्र अनेकदा असे वातावरण मिळत नाही. हायपो ग्लासीमीया, न्युमोनिया यासारख्या आजाराची बाधा नवजात बालकाला होते. त्यातून अनेकदा मृत्यू ओढवतो. सन २०१७-१८ या वर्षात वणी तालुक्यात तब्बल ३२ बालमृत्यू झालेत. सन २०१८-१९ मध्ये २६ बालमृत्यू झालेत, तर सन २०१९-२० (एप्रिल १९ ते डिसेंबर १९) या वर्षात २४ बालमृत्यू झाले. एकूण आकडेवारीवर नजर फिरविल्यास मागील वर्षात बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.वणी तालुक्यात शिरपूर, कायर, कोलगाव व राजूर कॉलरी अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु रिक्तपदांमुळे ही आरोग्य केंद्र पांगळी झाली आहेत. चारपैकी कोलगाव व कायर येथे सर्वाधिक प्रसुती केली जाते. परंतु चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर रिक्तपदे आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.कोलगाव आरोग्य केंद्रात १ औषध निर्माण अधिकारी, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ कनिष्ठ लिपीक, १ नेत्र चिकीत्सा सहाय्यक, चार आरोग्य सेवक (पुरूष), पाच आरोग्यसेवक (महिला), १ वाहनचालक, तीन परिचर अशी १७ पदे रिक्त आहेत. उर्वरित तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही अशीच अवस्था आहे. कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ पदे मंजूर असली तरी त्यातील तब्बल २० पदे रिक्त आहेत. उर्वरित दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेच हाल आहेत. कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने रुग्णांना हवी तशी आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.वणी तालुक्यात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असल्याने त्याचाही परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. या भागात कोळसा खाणी असल्याने कोळशाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे कोळशाची धूळ सदैव वातावरणात पसरत असते. त्यातूनच अनेक बालकांना जन्मताच दमा या आजारांची बाधा होत आहे.८४ अर्भकांचा उदरातच झाला मृत्यूवणी तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण जसे अधिक आहेत. तसेच कमी दिवसात प्रसुती होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यातून गेल्या तीन वर्षांत ८४ अर्भकांचा मातेच्या उदरातच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल