शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे ८० टक्के रिझर्वेशन प्रवाशांअभावी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:30 IST

कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. यामुळे धास्तावलेले नागरिक परगावी जाण्याचे टाळत आहेत. ॲडव्हान्स बुकिंग केल्यानंतरही कोरोना साथीमुळे अनेकांनी लांब पल्ल्याचे प्रवास रद्द केले आहेत. रोजमजुरीच्या शोधात पुणे आणि मुंबईकडे धाव घेणारा मोठा वर्ग थांबला आहे. यामुळे या मार्गावर असणाऱ्या प्रवासी स्टेशनलाही याचा फटका बसला आहे. 

ठळक मुद्देकोरोनाने प्रवासी थांबले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिले जाते. यामुळे सर्वाधिक प्रवासी मिळविणाऱ्या रेल्वेवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी होते. यासाठी नागरिक चार ते पाच महिने आधीच बाहेरगावी जाण्यासाठी बुकिंग करतात. कोरोना साथीपासून हे चित्र पार बिघडले आहे. बुकिंग झालेल्या एकूण प्रवाशांपैकी ८० टक्के प्रवासी आपला प्रवास रद्द करीत आहे. कोरोनाचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत. यामुळे धास्तावलेले नागरिक परगावी जाण्याचे टाळत आहेत. ॲडव्हान्स बुकिंग केल्यानंतरही कोरोना साथीमुळे अनेकांनी लांब पल्ल्याचे प्रवास रद्द केले आहेत. रोजमजुरीच्या शोधात पुणे आणि मुंबईकडे धाव घेणारा मोठा वर्ग थांबला आहे. यामुळे या मार्गावर असणाऱ्या प्रवासी स्टेशनलाही याचा फटका बसला आहे. पूर्वी दरदिवसाला तीन ते साडेतीन लाख रुपयांचे बुकिंग यवतमाळमधून होत हाेते. आता प्रवासी संख्या घटल्याने हे बुकिंग एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत खाली आले आहे. यातही अनेक प्रवासी वेळेवर आपला प्रवास रद्द करीत आहे. कोरोनाची स्थिती सुधारेपर्यंत रेल्वेच्या प्रवासाचे चित्र असेच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकप्रिय फेऱ्या प्रभावितजिल्ह्यातून पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे लोंढे विदर्भ एक्सप्रेस, गोंडवाना एक्सप्रेस या रेल्वे मार्गाने जात होते. पुण्यात आणि मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यातून याठिकाणाकडे जाणारे प्रवासी थांबले आहेत. परिणामी रेल्वेच्या फेऱ्यांना मिळणारी प्रवासी संख्या रोडावली आहे. यामुळे ॲडव्हान्स बुकिंग ऐनवेळी रद्द होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एकूण बुकिंग झाल्यानंतर वेळेपर्यंत ८० टक्के बुकिंग रद्द होत आहे. २० टक्केच प्रवासी रेल्वेने प्रवास करताना पाहायला मिळत आहे.

परीक्षेनंतर अवकळा

नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धा परीक्षेसाठी जिल्ह्यातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये गेले होते. रेल्वेचे तिकीट कमी असल्याने परीक्षेच्या काळात रेल्वे सर्वाधिक हाऊसफुल्ल होती. परीक्षा झाल्यानंतर रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. नियमित प्रवास करणारे प्रवासीही थांबले आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे