शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७८ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
4
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
5
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
6
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
7
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
8
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
9
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
10
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
11
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
12
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
13
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
14
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
15
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
16
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
17
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
18
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
19
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
20
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात

जिल्ह्यातील ७७ टक्के विद्यार्थी गणितामध्ये कच्चे; काय म्हणतोय, 'असर'चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 18:05 IST

शिक्षकांना दाखविला आरसा : अध्ययनाची ठरवावी लागणार दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासंदर्भात 'असर २०२४'चा अहवाल समोर आला आहे. असरच्या अहवालाने शिक्षकांना आरसाच दाखविला असून, आत्मचिंतन करून अध्ययन व अध्यापनाची दिशा ठरवावी लागणार आहे. तर, अप्रगत असलेले विद्यार्थी प्रगत होऊन पुढे येऊ शकतात.

तिसरी ते पाचवीच्या ६३ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. तर, इयत्ता पाचवी ते आठवीच्या ७७ टक्के विद्यार्थी गणितात कच्चे आहेत. शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता व प्राथमिक शिक्षणाची स्थिती जाणून घेण्यासाठी 'असर'च्या वतीने दरवर्षी सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. या सर्वेक्षणात ३ ते १६ वयोगटातील शालेय मुलांची आणि ५ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांच्या भाविक आणि गणितीय ज्ञानाची तपासणी करण्यात येते. तिसरी ते पाचवी आणि पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जातो. २०२४ मध्ये राज्यात असरकडून मुलांच्या शिक्षण पातळीचे मूल्यमापन करण्यात आले. यात जिल्ह्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले. सहा ते १४ वयोगटातील ६१.१ विद्यार्थी सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. तर, ०.३ टक्के विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचेही नमूद आहे.

शिक्षकांनी असरच्या अहवालाकडे सकारात्मक दृष्टीने बघावे, त्यातून आपल्या अध्ययनाची दिशा निश्चित करावी. तरच पुढील काळात विद्यार्थ्यांमध्ये प्रगती झाल्याचे दिसून येईल. त्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी काही बाबींची गरज आहे. 

जिल्हा गुणवत्तेत माघारला

  • जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये जिल्हा माघारल्याचे 'असर'च्या अहवालातून दिसून येत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीच्या ४८ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे पुस्तक व्यवस्थित वाचता आले नाही. याचबरोबर ७७टक्के विद्यार्थ्यांना गुणकार आणि भागाकार करता येत नसल्याचे अहवालात दिसून येत आहे.
  • असरने जिल्हा परिषद, नगरपालिका, आश्रमशाळा, अनुदानित शाळा येथील विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासणी केली. यात मुलांचे मराठी वाचन, गणित कच्चे असल्याचे आढळून आले.
  • यामुळे सरकारी शाळांतील शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र हा अहवालही काहीसा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र असरच्या अहवालाला सकारात्मक दृष्टीने बघणे आवश्यक आहे.

कार्ये व उद्दिष्टे काय?विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबाबत प्रगती जाणून घेण्यासाठी असर सर्वेक्षण दरवर्षी केले जाते. या माध्यमातून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता तपासणे प्रमुख उद्देश आहे. शिक्षकांनी उणीवा ओळखून त्यात बदल करणे अपेक्षित आहे. अभ्यासात अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी अधिक काळजी घेतल्यास तेच विद्यार्थी प्रगत होतील.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम कधीपासून?२०१४ मध्ये राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. २०१८-१९ पर्यंत हा कार्यक्रम निरंतर चालला. मात्र, कोविड काळात याला ब्रेक बसला. मात्र, त्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जाणून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

किती टक्के मुलांना जमते मराठी, गणितइयत्ता तिसरी ते पाचवीच्या केवळ ३७.९ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे मराठी पुस्तक वाचता येते. तर, ३१.१ टक्के विद्यार्थ्यांना गणित येते. तर पाचवी ते आठवीच्या ५२.३ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे मराठी पुस्तक वाचता येते. केवळ २३ टक्के विद्यार्थ्यांना गणिताचा हिशोब करता येतो.

६३ टक्केविद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही. तर पाचवी ते आठवीचे ७७टक्के विद्यार्थी गणितात कच्चे असल्याचे समोर आले आहे.

"असर'चा सर्वेमुळे शिक्षकांनी निराश न होता आपल्या अध्ययन व अध्यापनाची दिशा निश्चित केली पाहिजे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात मदत होणार आहे. याकडे सकारात्मक बघावे."- डॉ. प्रशांत गावंडे, प्राचार्य, डायट,

टॅग्स :Educationशिक्षणYavatmalयवतमाळ