शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या संरक्षणार्थ उतरले ६०० होमगार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. यामुळे पोलिसांच्या मदतीला होमगार्डची कुमक मागविण्यात आली आहे. विविध गावातून आलेले ही होमगार्ड कोरोनाच्या लढाईत एकनिष्ठेने आपले काम पार पाडताना दिसत आहे. दिवस-रात्र अशी १२ तासांची सेवा ते देत आहेत. शहरात वाहतूक नियंत्रित ठेवण्यासोबत कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या लढ्यात शहराला सुरक्षा देण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ कमी पडले आहे. अशा स्थितीत पोलिसांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करणारे होमगार्ड अहोरात्र काम करीत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते नागरिकांना संरक्षण देत आहेत. विशेष म्हणजे त्यांची अस्थायी स्वरूपाची सेवा आहे. यानंतरही त्यांचे काम निष्ठापूर्वक पार पाडले जात आहे.शहरात पोलिसांचे मनुष्यबळ कमी आहे. यामुळे पोलिसांच्या मदतीला होमगार्डची कुमक मागविण्यात आली आहे. विविध गावातून आलेले ही होमगार्ड कोरोनाच्या लढाईत एकनिष्ठेने आपले काम पार पाडताना दिसत आहे. दिवस-रात्र अशी १२ तासांची सेवा ते देत आहेत. शहरात वाहतूक नियंत्रित ठेवण्यासोबत कायदा आणि सुव्यवस्था आबाधीत राखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याकरिता नागरिकांना कोरोनापासून सावध होण्याचे आवाहन होमगार्डनी केले आहे. अनेक लोक त्यांना सुरक्षा विषयावर हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते तितक्याच शांततेने त्यांना समजावतात. हाताबाहेर प्रकार असेल तर त्यांना त्यांच्या नियमानुसार कारवाईचा दंडही करतात. गृहरक्षक दलाचे जवान कोरोनापासून इतरांची सुरक्षा करीत आहे. यासोबतच स्वत:चीही काळजी घेत आहे. सॅनिटायझर, मास्क आणि हॅन्डग्लोजचा ते वापर करीत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देत आहे.ड्रेस, बूट मिळालेच नाहीहोमगार्ड मंडळींना लागणारा ड्रेस गत दोन ते तीन वर्षांपासून मिळालाच नाही. होमगार्ड म्हणून ज्यांची नियुक्ती झाली. त्यांनी स्वत:च गणवेश शिवून घेतला. बूटसह आवश्यक साहित्य घेतले आहे. त्यांना गणवेश मिळावे, अशी मागणी होमगार्डकडून होत आहे.पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून करतात कामपोलिसांच्या मदतीला यवतमाळ शहरातील विविध भागात ६०० होमगार्ड काम करीत आहेत. गाड्यांची तपासणी करणे, वाहनधारकांना पायबंद घालणे, गावात सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यासाठी ही मंडळी काम करीत आहे.

टॅग्स :Policeपोलिस