शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

खुल्या बाजारात जाणारे 495 पोते सरकारी धान्य केले जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

नागपूर रोडवरील आरटीओ कार्यालयामागे धामणगाव येथून आलेला शासकीय धान्याचा ट्रक रिकामा होत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांच्या नेतृत्वात पथकाने धाड घातली. यावेळी पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे उपस्थित होते. तन्वीर शाह व मनोज जयस्वाल हे दोघे शासकीय धान्य उतरवित असल्याचे आढळून आले. तब्बल ९५ क्विंटल गहू त्या ठिकाणी सापडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात शासकीय धान्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खुल्या बाजारात चढ्या दराने ब्रॅन्डेडच्या नावाखाली विकले जाणारे हे धान्य गरिबाच्या हक्काचे आहे. शासकीय धान्यावर प्रक्रिया करून ब्रॅन्ड म्हणून त्याची विक्री होते. याचा भंडाफाेड गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईतून झाला. तीन ठिकाणी धाडी घालत तब्बल ४९५ क्विंटल धान्य जप्त केले आहे. पुरवठा विभागाकडून नमुने घेण्यात आले आहे. नागपूर रोडवरील आरटीओ कार्यालयामागे धामणगाव येथून आलेला शासकीय धान्याचा ट्रक रिकामा होत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यावरून सहायक पोलीस निरीक्षक अमोल पुरी यांच्या नेतृत्वात पथकाने धाड घातली. यावेळी पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे उपस्थित होते. तन्वीर शाह व मनोज जयस्वाल हे दोघे शासकीय धान्य उतरवित असल्याचे आढळून आले. तब्बल ९५ क्विंटल गहू त्या ठिकाणी सापडला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शासकीय धान्य राणीसती मंदिर परिसरातील कमला ट्रेडींग येथे पोहोचविले असल्याचे सांगण्यात आले. तसेच या ठिकाणी लागून असलेल्या भारत अग्रवाल यांच्याकडेही गहू टाकल्याचे तन्वीर शाह याने पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी कमला ट्रेडींग व भारत अग्रवाल यांच्या गोदामावर धाड घातली. तेथे शासकीय पोत्यांमध्ये धान्य भरुन असल्याचे आढळून आले. भारत अग्रवाल यांच्याकडेही शासकीय गव्हाचा मोठा साठा हाती लागला. तर श्यामसुंदर आनंदीलाल अग्रवाल यांच्या मालकीच्या कमला ट्रेडिंग कंपनीतही धान्य आढळून आले. याच ठिकाणी धान्यवर प्रक्रिया करण्याचा कारखाना चालविला जात होता. पुरवठा निरीक्षक सतीश डोंगरे यांनी येथील धान्याचे नमुने गोळा केले. हे धान्य तस्करीचे रॅकेट सर्वत्र फैलावले आहे. पोलिसांनी एकाच कारवाईत यातील तीन कड्या उघड केल्या. आता पुढील कारवाई पुरवठा विभागाच्या अहवालावर निश्चित केली जाणार आहे. कारवाईमध्ये सहायक निरीक्षक शुभांगी आगासे, पोलीस उपनिरीक्षक योगेश रंधे, कविश पाळेकर, विशाल भगत, गजानन डोंगरे, शेख सलमान आदींनी सहभाग घेतला. 

शासकीय गोदामातून धान्य थेट तस्करांच्या गोदामात - धामणगाव रेल्वे स्टेशनवरील शासकीय गोदामातून निघालेले धान्य थेट तस्कराच्या गोदामावर पोहोचले. या धान्याच्या पोत्यांना शासकीय टॅग लागलेेले होते. भारत सरकारच्या सौजन्याने मध्य प्रदेश  येथे पॅकिंग करण्यात आल्याची नोंद या धान्याच्या पोत्यावर होती. त्यावरूनच पुढील कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पाचजणांना ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळावरून दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :PoliceपोलिसSmugglingतस्करी