शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे ३५ कोटी मिळाले

By admin | Updated: September 9, 2014 00:39 IST

सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक : शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आॅनलाईन जमायवतमाळ : सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आॅनलाईन जमा केली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे ९७ हजार ९०६ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना शासनाने गतवर्षी राबविली. पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून राबविलेल्या या योजनेच्या रकमेला काही दिवसांपूर्वीच मंजूरी मिळाली. प्रत्यक्षात रक्कम उपलब्ध झाली नव्हती. आता प्राप्त झालेल्या रकमेतून संबंधित शेतकऱ्यांना वितरण केले जात आहे. मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या पिकांसाठी योजनेचा लाभ दिला जात आहे.जिल्ह्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यातील २९ हजार ७४९ शेतकऱ्यांना ९ कोटी ५२ लाख ८४० रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्या खालोखाल महागाव तालुक्याच्या १६ हजार १२ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लाख ५८ हजार ८९१ रुपयांचे वाटप होणार आहे. दारव्हा तालुक्यातील १४ हजार ८५८ शेतकऱ्यांना ३ कोटी ८१ लाख ७५ हजार ९०४ तर आर्णी तालुक्यातील ११ हजार २४ शेतकऱ्यांना ७ कोटी २२ लाख १६ हजार ३८३ रुपयांचे वाटप होणार आहे.यवतमाळ तालुक्यातील ३ हजार ७३, कळंब ५ हजार २४१, राळेगाव ३ हजार ५७७, घाटंजी ४५५, नेर ५८१, बाभूळगाव ३ हजार ३९९, पुसद २ हजार ५१५, दिग्रस १ हजार ४१, पांढरकवडा ३ हजार ९०५, वणी १३२, मारेगाव २६४ आणि झरीजामणी तालुक्यातील २ हजार ८० शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पीक विम्याचा सर्वाधिक लाभ घेणारे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे. ७३ हजार ४३८ शेतकऱ्यांना या पिकाचा विमा मिळणार आहे. त्या खालोखाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ७ हजार ७३३ एवढी आहे, अशी माहिती येथील विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे उपस्थित होते. (वार्ताहर)