शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी ३० लाख क्विंटल कापूस खरेदी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात पावणे पाच लाख हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गुलाबी बोंडअळीने ...

ठळक मुद्देसीसीआयचे सात तर पणनचे चार केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : यावर्षीच्या खरीप हंगामात पावणे पाच लाख हेक्टरवर कापसाची पेरणी करण्यात आली आहे. गुलाबी बोंडअळीने कापसाचे नुकसान झाले असले तरी यावर्षी ३० लाख क्विंटल कापूस खरेदी होण्याचा अंदाज सहकार विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सात खरेदी केंद्र सीसीआयचे असणार आहे. तर चार खरेदी केंद्र पणन महासंघाचे असणार आहे. यासाठी यवतमाळ, कळंब, आर्णी आणि मारेगाव या केंद्रांवर पणन महासंघाची कापूस खरेदी होणार आहे.त्या दृष्टीने जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांवर शासकीय यंत्रणेने संपूर्ण व्यवस्था केली आहे. १७ नोव्हेंबरपासून सीसीआयच्या कापूस संकलन केंद्रांवर कापसाची खरेदी होणार आहे. तर १८ नोव्हेंबरपासून पणन महासंघाच्या कापूस संकलन केंद्रावर कापसाची खरेदी होणार आहे. यावर्षी खरेदीची दिवाळीनंतर होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ऑनलाईन पद्धतीने एक लाखांवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आपली नोंद पणन महासंघाच्या पोर्टलवर केली आहे. यावर्षी कापूस खरेदी करण्यासाठी कमी संकलन केंद्र असले तरी त्याचे नियोजन केल्यामुळे होणारा गोंधळ टळणार असल्याचे पणनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरदिवसाला नऊ हजार क्विंटल कापसाचे जिनिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ जिनिंगमध्ये ३२४ डबल रोलर मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे निर्मित कापसावर तत्काळ प्रक्रिया होऊन त्याच्या गाठी तयार करता येणार आहे. सीसीआय वणी, शिंदोला, राळेगाव, घाटंजी, मुकुटबन, पांढरकवडा आणि खैरी या केंद्रांवर आपली खरेदी करणार आहे. खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे शासकीय दर क्विंटल मागे ५०० रुपयाने अधिक आहे. यामुळे शुभारंभापासूनच कापूस विक्रीसाठी शासकीय केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासकीय केंद्रांना नियोजन करावे लागणार आहे.

लांब धाग्याचा कापूसवणी, पांढरकवडा, राळेगाव या पट्ट्यात लांब धाग्याचा कापूस आहे. या कापसाला सिंगापूर आणि हाॅंगकाॅंगवरून मागणी आहे. या कापसाला चांगले दर मिळतील, असा विश्वास जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती