शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२८१ कोटी कर्जाची परतफेड

By admin | Updated: April 18, 2015 02:07 IST

शेतकरी सतत दुष्काळ व नापिकीचा सामना करीत असल्याने आर्थिक संकटात सापडला आहे.

यवतमाळ : शेतकरी सतत दुष्काळ व नापिकीचा सामना करीत असल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २८१ कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शासन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याकडून कर्जाची सक्तीने वसुली केली जाऊ नये, त्यांना थकीत कर्जाचे पुढील तीन वर्षांसाठी हप्ते पाडून द्यावे, असे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक अंमलबजावणीही करीत आहे. त्याच वेळी बँकेने सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन बँकेच्या कर्ज वसुलीवर भर कायम ठेवला आहे. बँकेची यंत्रणा शेतकऱ्याच्या भेटी-गाठी घेऊन त्यांचे ‘ब्रेन वॉश’ करताना दिसत आहेत. शासनाच्या आदेशानुसार बँक कर्जाचे हप्ते पाडून देण्यास तयार असले तरी यामुळे शेतकऱ्याचे कसे नुकसान होते, त्याच्यावर व्याज व कर्जाचा कसा बोझा बसतो, हे पटवून दिले जात आहे. कर्जाचे हप्ते पाडणे म्हणजे आजचे संकट उद्यावर लोटण्याचा प्रकार असल्याचेही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले जात आहे. ही बाब पटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची वेळीच परतफेड करून शून्य टक्के व्याज दराचा लाभ घेण्याची तयारी दर्शविली. त्यातूनच बँकेच्या तब्बल २८१ कोटींच्या कर्जाची शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने परतफेड केली आहे. आजही जिल्हा बँकेत दररोज ७० ते ८० लाख रुपयांच्या कर्जाची वसुली होते आहे. गेल्या वर्षी बँकेने ३५८ कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले होते. यातील आतापर्यंत २६१ कोटी रुपये वसूल झाले आहे. आणखी ८० ते ९० कोटींची वसुली पुढील तीन महिन्यात होण्याची अपेक्षा बँक व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. कारण शेतकऱ्यांच्या कर्ज परतफेडीला जूनपर्यंत तीन महिन्याची मुदत वाढवून दिली गेली आहे. वास्तविक बँकेला ९०० कोटी रुपयांच्या कर्ज परतफेडीची अपेक्षा आहे. यातील ३५८ कोटी पीक कर्जाचे आहे. तर ४२३ कोटी रुपयांची रक्कम गेल्या काही वर्षांपासून थकीत आहे. या थकीत रकमेपैकी केवळ २० कोटी रुपये यावर्षी वसूल झाले आहे. त्यात अनेक मुदती कर्जांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)