पिंपळखुटी चेकपोस्टवर २० जनावरांना जीवदान, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त : पांढरकवडा पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:47 AM2021-08-12T04:47:36+5:302021-08-12T04:47:36+5:30

पांढरकवडा पोलिसांकडून सातत्याने जनावर तस्करीविरूद्ध कारवाया सुरूच आहे. मात्र तरीही पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून जनावरांची तस्करी सुरूच आहे. मंगळवारी ...

20 animals rescued at Pimpalkhuti check post, Rs 17 lakh confiscated: Pandharkavada police take action | पिंपळखुटी चेकपोस्टवर २० जनावरांना जीवदान, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त : पांढरकवडा पोलिसांनी केली कारवाई

पिंपळखुटी चेकपोस्टवर २० जनावरांना जीवदान, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त : पांढरकवडा पोलिसांनी केली कारवाई

Next

पांढरकवडा पोलिसांकडून सातत्याने जनावर तस्करीविरूद्ध कारवाया सुरूच आहे. मात्र तरीही पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून जनावरांची तस्करी सुरूच आहे. मंगळवारी पहाटे खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे, सुहास मंदावार, निलेश निमकर, सचिन काकडे व पोलीस कर्मचाऱ्यांनी पैनगंगा नदीच्या पुलाजवळ सापळा रचला. सोबतच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, महेश नाईक, सचिन काकडे, सिध्दार्थ कांबळे हे खासगी वाहनाने पिंपळखुटी चेकपोस्टकडे रवाना झाले. दरम्यान, केळापूर बसथांब्याजवळ या अधिकाऱ्यांनीही सापळा लावला. नागपूर-हैद्राबाद मार्गाने जाणाऱ्या वाहनांवर या पथकाने लक्ष ठेवले. याचवेळी एम.एच.३४-एम.७६०५ हा ट्रक अदिलाबादकडे जाताना दिसला. या ट्रकला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने ट्रक न थांबवता वेगाने अदिलाबादच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी या ट्रकचा पाठलाग केला. पाटणबोरीमार्गे पिंपळखुटी आर.टी.ओ. चेकपोस्टवर पोलीस उपनिरीक्षक बारींगे व त्यांच्या पथकाने नाकाबंदी करून हा ट्रक अडविला. त्यावेळी ट्रकचालक व क्लीनर ट्रक तेथेच सोडून पळून गेले. या ट्रकची पाहणी केली असता, ट्रकच्या आतमध्ये लहान-मोठे २० बैल दिसून आले. त्यातील चार बैल मृतावस्थेत होते. पोलिसांनी उर्वरित बैलांची सुटका केली. तसेच ट्रकचालक व क्लिनरविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.

100821\img-20210810-wa0072.jpg

पाटणबोरी येथे पांढरकवडा पोलिसांनी बैलाचा ट्रक पकडला

Web Title: 20 animals rescued at Pimpalkhuti check post, Rs 17 lakh confiscated: Pandharkavada police take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.