शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे १५५ चालक, वाहक कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

चालक आणि वाहक रुजू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. १०८७ चालकांपैकी ८३ आणि ७७२ वाहकांपैकी फक्त ७२ जण कामावर आले आहेत. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, रविवारी या कर्मचाऱ्यांनी येथील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या मंडपात सरकारच्या भूमिकेचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातील एकूण १५५ चालक, वाहक कामावर रुजू झाले आहेत. रविवारपर्यंत विविध प्रवर्गांतील ४९४ कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली आहे. मात्र, एसटी बसेस मार्गावर निघाल्या नाहीत. संपात सहभागी कर्मचाऱ्यांची संख्या २०४२ इतकी आहे.चालक आणि वाहक रुजू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. १०८७ चालकांपैकी ८३ आणि ७७२ वाहकांपैकी फक्त ७२ जण कामावर आले आहेत. पुढील काही दिवसांत ही संख्या वाढेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, रविवारी या कर्मचाऱ्यांनी येथील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या मंडपात सरकारच्या भूमिकेचा काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, ही मागणी घेऊन कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या यवतमाळ येथील संपाचा रविवारी ३१ वा दिवस उजाडला. हा कालावधी जसजसा वाढत आहे, तसतसे कर्मचारी कामावर जाण्याची संख्याही वाढत आहे. प्रशासकीय संवर्गातील ३५१ पैकी २६२ कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावली. कार्यशाळेतील ४१४ पैकी ७७ कर्मचारी रुजू झाले आहेत.महामंडळाने कर्मचाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ करण्याची कारवाईसुद्धा केली आहे. यानंतरही चालक-वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचारी कामावर जाण्यास तयार नाही. 

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप