शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेतून १४७ कोटींचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 05:00 IST

महागाईच्या काळात खासगी रुग्णालयातील उपचार खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला महागडा उपचार परवडत नाही. त्यामुळे अनेकांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच थांबतो. ही परिस्थिती लक्षात घेऊनच राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.

ठळक मुद्देसात वर्षातील स्थिती : ४१ हजार रुग्णांसह शेतकऱ्यांनाही लाभ

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णाला मोफत उपचार मिळतो. त्यासाठी जिल्ह्यात १५ खासगी रुग्णालय, तर आठ शासकीय रुग्णालय योजनेशी जोडलेले आहेत. २१ नोव्हेंबर २०१३ पासून या योजनेचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत ३९ हजार ४८३ रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. या मोबदल्यात खासगी रुग्णालयांना १४७ कोटी ६ लाख ४९ हजार ७९२ रुपयांचा परतावा मिळाला आहे.महागाईच्या काळात खासगी रुग्णालयातील उपचार खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला महागडा उपचार परवडत नाही. त्यामुळे अनेकांचा जीवनप्रवास अर्ध्यावरच थांबतो. ही परिस्थिती लक्षात घेऊनच राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी योजना म्हणून ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. नंतर युती सरकारच्या काळात योजनेचे नाव बदलवून महात्मा फुले जनआरोग्य योजना करण्यात आली. शिवाय या योजनेची व्याप्तीही वाढविण्यात आली. सामान्य नागरिकांना एखादा गंभीर आजार झाला तर पैशांअभावी त्याला जीव गमवावा लागू शकतो. आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमुळे खासगीतही रुग्णांना मोफत उपचार घेता येत आहे. जनआरोग्य योजनेत लाभार्थींना लाभ मिळवून देण्यामध्ये खासगी रुग्णालय आघाडीवर आहेत. जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह १५ खासगी रुग्णालयातही जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. याशिवाय तीन उपजिल्हा रुग्णालय व पाच ग्रामीण रुग्णालयातही योजनेचा लाभ देण्यात येतो. शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया व इतर दुर्धर आजारांचा उपचार घेणाºया रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच खासगी रुग्णालयांना जनआरोग्य योजनेतून उपचार खर्चाच्या मोबदल्यात कोट्यवधींचा परतावा मिळाला आहे. या योजनेत १५ हजार २७९ शेतकऱ्यांनाही लाभ देण्यात आला. ४०० च्यावर आजारांवर उपचार केला जातो. यात विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचाही समावेश आहे.