शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

बारावी परीक्षा रद्द; आता पदवी, अन्य प्रवेश कसे होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 5:00 AM

दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावी पाठोपाठ लगेच बारावीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नाहक अन्याय सहन करावा लागणार आहे. तर काही जणांना आनंदही झाला आहे. मात्र बारावीनंतरच्या प्रवेश प्रक्रियेबाबत शासनाने अद्यापही धोरण जाहीर केले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा टप्पा मानला जातो. मात्र या दोन्ही परीक्षा रद्द झाल्याने काहीसे नाराजीचे सूर उमटत आहे. इंजिनिअरींग, मेडिकल यांच्या प्रवेशासाठी बारावीनंतर स्वतंत्र प्रवेश परीक्षा होत असतात. या व्यतिरिक्त पदवी अभ्यासक्रम तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी बारावी परीक्षेतील गुण महत्वाचे मानले जातात. परंतु बारावीचीच परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षा कशा घेता येणार हा पेच निर्माण झाला आहे. याशिवाय सरसकट होणाऱ्या मूल्यांकनात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यांची क्षमता ९०टक्के गुण मिळविण्याची आहे. त्यांना कदाचित ७५ टक्के गुणांवर समाधान मानावे लागेल. तर ज्यांची क्षमता सरासरी आहे, त्यांना कदाचित प्रावीण्य श्रेणी मिळण्याची भीती वर्तविली जात आहे. असे झाल्यास येत्या काळात समाजातील शैक्षणिक गुणवत्तेबाबतच गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याचीही भीती जाणकारांकडून वर्तविली जात आहे. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना अडचणी आल्यास अनेक घरांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिडचिड वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने पदवी व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे निकष तातडीने जाहीर करावे, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. 

बारावीनंतरच्या संधी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याची संधी बारावीनंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असते. फॅशन डिझायनिंग, नर्सिंग, पत्रकारिता, कायदा व अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी बारावी परीक्षेचे गुण विचारात घेतले जातात. बारावीतील यशानुसार पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, अभियांत्रिकी, कृषी आदी विविध क्षेत्रांमध्ये करिअर करण्याची संधी मिळते. बारावीनंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट आदी परीक्षा देऊन अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी स्वत:ची पात्रता सिद्ध करता येते. 

 प्राचार्य, प्राध्यापक म्हणतात...

बारावीच्या भरवश्यावर विद्यार्थी उज्वल भविष्याचे स्वप्न पाहत असतात. बारावीवरच पुढचे जीवन अवलंबून असते. परीक्षा रद्द झाल्याने अडचणी येऊ शकता. या निर्णयामुळे कोणत्याही होतकरू विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची राज्य सरकारने काळजी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.      - प्रा. जितेंद्र जुनघरे 

सध्या करिअरच्या दृष्टीने बारावीचा निकाल तेवढासा महत्वाचा राहिलेला नाही. पुढच्या अभ्यासक्रमांना प्रवेश देताना तशाही प्रवेश परीक्षा घेतल्या जातातच. त्यात विद्यार्थी आपली पात्रता सिद्ध करू शकतात. मात्र अशा एन्टरन्स एक्झामसाठी काही अटी शासनाने शिथिल केल्या पाहिजेत. तरच सर्वांना न्याय मिळेल. - प्रा.डाॅ.रमजान विराणी

बारावीची परीक्षा रद्द झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांना जेईई तसेच नीट परीक्षा द्यायची आहे, त्यांनी काय करावे ? हुशार विद्यार्थ्यांचे या निर्णयाने नुकसान केले आहे. पदवी प्रवेशासाठी अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. - साक्षी किशोर बनारसे, प्राचार्य

 

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा