Next

घोडबंदर गावात मुक्तपणे फिरणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 13:24 IST2018-09-26T13:23:19+5:302018-09-26T13:24:55+5:30

भार्इंदर : संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग  क्र.13 मधील घोडबंदर गावात एक बिबट्या रस्त्यावरून ...

भार्इंदर : संजय गांधी उद्यानालाच लागून असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग  क्र.13 मधील घोडबंदर गावात एक बिबट्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. घोडबंदर गावात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली आणि नागपूर वनविभागाला पत्रव्यवहार केला असून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले.