ठाणे : जुना आग्रा रोड येथील अल्मेडा बंगल्याजवळ सोमवारी सकाळी एका रिक्षाने पेट घेतला. यामध्ये रिक्षा जळून खाक झाली. सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही. ठाणे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग विझवली.