लंडनमध्ये सातारकरांचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 16:25 IST2017-09-03T16:24:36+5:302017-09-03T16:25:05+5:30
सातारा - संपूर्ण महाराष्ट्रात डॉल्बी बंदीचा आदर्श निर्माण करणाऱ्या सातारकरांनी आता सातासमुद्रापार जावून आपल्या उत्साहाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. ...
सातारा - संपूर्ण महाराष्ट्रात डॉल्बी बंदीचा आदर्श निर्माण करणाऱ्या सातारकरांनी आता सातासमुद्रापार जावून आपल्या उत्साहाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. ब्रिटन देशातील लंडनमध्येही यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक काढून भारतीयांनी आपल्या शिस्तबद्धतेचे दर्शन तमाम लंडनवासियांना दिले. विशेष म्हणजे या मिरवणुकीचे व्यवस्थापन एका सातारकराकडेच होते.