साता-यात अत्याचाराच्या आरोपातील तिघांना जमावाकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 15:36 IST2018-01-14T20:01:12+5:302018-01-15T15:36:31+5:30
सातारा- खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सलग दोन दिवस अत्याचार केल्याची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
सातारा- खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सलग दोन दिवस अत्याचार केल्याची फिर्याद वडूज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यांना वडूज पोलिसांनी अटक करून पोलिस ठाण्यात आणले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी तिघांना मारहाण केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ जमावास दूर करीत तिघांना पोलिस कोठडीत नेले. मारहाणीची ही घटना रविवारी रात्री सातच्या सुमारास घडली.