Next

ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेेरे यांनी जागवल्या भाई वैद्य यांच्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 00:34 IST2018-04-03T00:33:36+5:302018-04-03T00:34:00+5:30

पुणे - आत्ताच ढवळीकर, पानतावणे आणि शिरवाळकर यांना श्रद्धांजली वाहत असताना ही बातमी आली.त्यांनी अक्षरशः महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठवलं ...

पुणे - आत्ताच ढवळीकर, पानतावणे आणि शिरवाळकर यांना श्रद्धांजली वाहत असताना ही बातमी आली.त्यांनी अक्षरशः महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठवलं आहे.एक एक माणूस उभं करणं अवघड असताना त्यांनी हजारो माणसं उभी केली.समाजवादावर पक्की निष्ठा हे त्यांच्या कामाचं आयुष्यभर बळ राहील.छोटे मोठे आजार बाजूला ठेवून त्यांनी समाज शिक्षणाचे काम शेवटपर्यंत निष्ठेने केले.त्यांच्या कार्यकर्त्यांचे बळ हेच त्यांच्या निष्ठेचे फलित होते. त्यांच्यात शिक्षकी पेशा प्रचंड मुरलेला होता. ते समाजशिक्षण शेवटपर्यंत करत होते.अशा माणसांच्या जाण्याने होणारे नुकसान कधीही भरून निघत नाही.(व्हिडिओ - नेहा सराफ)