Next

पुण्यात विनाचालक बस चालविण्याचा पीएमपीचा ‘पराक्रम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 21:33 IST2017-09-12T21:33:15+5:302017-09-12T21:33:31+5:30

पुणे , दि. 12 - विना चालक बस रस्त्यावर धावण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल तेव्हा होईल मात्र, पीएमपीएमएलने हा  ‘पराक्रम’ ...

पुणे , दि. 12 - विना चालक बस रस्त्यावर धावण्याचे तंत्रज्ञान विकसित होईल तेव्हा होईल मात्र, पीएमपीएमएलने हा  ‘पराक्रम’ करुन दाखवला आहे. पिंपळे गुरव येथील बस स्थानकामध्ये उभी असलेली एक बस चक्क विना चालक सुरु झाली आणि 100 मीटर पुढे गेली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र, रस्त्यावरील दुचाकी आणि एका गॅरेजचे मात्र नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास पिंपळे-गुरव बस स्थानकामध्ये घडली. 

टॅग्स :पुणेPune