Next

आमचा जीव तेवढा राहिला; बाकी सगळं गेलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 13:05 IST2019-09-26T13:05:26+5:302019-09-26T13:05:37+5:30

रात्री पाऊस सुरू झाला तो पिण्याचं काय तोंडचंपण पाणी पळवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. ही गोष्ट आहे पुण्यातले आरती आणि ...

रात्री पाऊस सुरू झाला तो पिण्याचं काय तोंडचंपण पाणी पळवेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. ही गोष्ट आहे पुण्यातले आरती आणि अविनाश हरणे दांपत्याची. पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दांडेकर पुलावरील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांची वसाहत असलेल्या या भागातील अनेकांची घरे, घरातील वस्तू आणि कागदपत्रे डोळ्यासमोर वाहून गेली आणि उरले फक्त अश्रू.