बस का सोडत नाही म्हणून चालकास बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 15:39 IST2018-08-02T15:38:55+5:302018-08-02T15:39:46+5:30
पुणे - बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील ...
पुणे - बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर घडली आहे. या घटनेत बस चालकाला काही प्रवाशांनी बेदम मारहाण केली असून जखमी चालकास ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजय जगन्नाथ जाधव असे जखमी चालकाचे नाव आहे.