भीमाशंकरमध्ये ‘हर हर महादेव...’चा गजर; दिलीप वळसे पाटील यांनी केली सपत्निक केली पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 20:58 IST2018-02-13T19:43:43+5:302018-02-13T20:58:34+5:30
भीमाशंकर - ‘हर हर महादेव... जंगलवस्ती भीमाशंकरमहाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी ...
भीमाशंकर - ‘हर हर महादेव... जंगलवस्ती भीमाशंकरमहाराज की जय..!’ च्या जयघोषात श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रनिमित्त सुमारे एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. महाशिवरात्रीच्या रात्री १२ वाजता देवस्थानचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, माजी वनमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली.'