कायम तरुण दिसण्यासाठी काय करावं? How to have younger looking skin? Anti-ageing tips for youthful skin
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:52 IST2021-08-03T15:51:58+5:302021-08-03T15:52:23+5:30
जसजसं वय वाढत जातं सर्वातआधी त्याचा प्रभाव चेहऱ्यावर दिसू लागतो. अनेकदा चेहऱ्याची खूप काळजी घेऊनही वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावर दिसू लागतात. यात त्वचा सैल होणे, सुरकुत्या पडणे या समस्या होतात. प्रत्येकालाच वाटत असतं की, त्यांनी नेहमी तरूण दिसावं. पण हे नुसतं वाटून काही फायदा नाही. त्यासाठी काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. जर तुम्हालाही नेहमी तरूण दिसायचं असेल किंवा वाढत्या वयाची लक्षणे चेहऱ्यावरून दूर करायची असेल तर काही ड्रिंक्स फाय फायदेशीर ठरतात. या ड्रिंक्सचं नियमित सेवन करून तुम्ही नेहमी तरूण दिसू शकता. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे ड्रिंक्स.