Next

Lok Sabha Election 2019 : अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 11:17 AM2019-04-23T11:17:51+5:302019-04-23T11:18:36+5:30

नवी दिल्ली - लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होत आहे. ...

नवी दिल्ली - लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होत आहे. देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (23 एप्रिल) सकाळी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.