भाजयुमो कार्यकर्त्यांकडून भररस्त्यात हनुमान चालिसा पठण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 14:31 IST2019-06-26T14:29:59+5:302019-06-26T14:31:11+5:30
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधील सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जय श्रीराम बोलण्यावरुन हा वाद ...
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमधील सुरु असलेला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जय श्रीराम बोलण्यावरुन हा वाद रंगलेला असताना आता या राजकीय संघर्षाने धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम सुरु केलं आहे. मंगळवारी रात्री उशिरा भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हावडानजीक बाली खाल येथे शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर उतरुन हनुमान चालीसा पठण केलं.