Next

शॉर्टकट नव्हे थेट मृत्यूशी गाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 15:12 IST2018-08-31T14:39:03+5:302018-08-31T15:12:50+5:30

नाशिक : नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्ग उड्डाणपूलावरून पादचारी सर्रासपणे रेलिंग क्रॉस करतात आणि उड्डाणपूल ओलांडून ये-जा करतात. यावेळी भरधाव जाणाऱ्या ...

नाशिक : नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्ग उड्डाणपूलावरून पादचारी सर्रासपणे रेलिंग क्रॉस करतात आणि उड्डाणपूल ओलांडून ये-जा करतात. यावेळी भरधाव जाणाऱ्या वाहनांसमोर पादचारी आल्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. बुधवारी संध्याकाळी कामोदनगरजवळ एक कुटुंब उड्डाणपूल ओलांडत असताना भरधाव वेगाने नाशिककडे येत असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत चार वर्षीय मुलासह मातेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जेष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. या ठिकाणी बोगदा तयार करण्याची मागणी प्रलंबित आहे.

टॅग्स :नाशिकNashik