नागपूरातील तलावाच्या काठावर सशस्त्र दारुड्याचा हैदोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 18:04 IST2018-07-17T18:04:11+5:302018-07-17T18:04:23+5:30
नागपूर : अंबाझरी तलावाच्या काठावर पावसात चिंब होण्याची हौस भागवून घेणा-या शेकडो जणांची एका सशस्त्र दारूड्याने सोमवारी सायंकाळी घाबरगुंडी उडवली. शस्त्र घेऊन तो मागे धावत असल्याने तरुण, तरुणी, महिला, पुरूष अशा सर्वांनीच आरडाओरड करत जीव मुठीत घेऊन पळ काढला. बराच वेळेनंतर हिम्मत दाखवत एकाने त्याच्या हातचे शस्त्र हिसकावले. त्यानंतर पुढे आलेल्या काहींनी त्याला चोप दिला.