Next

ठाकरेंना जो त्रास झाला, तोच आता राणेंना का होतोय? Nitesh Rane after bail | Uddhav Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 00:39 IST2022-02-11T00:39:32+5:302022-02-11T00:39:52+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन झालं. या ऑपरेशननंतर त्यांना तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनालाही येऊ शकले नाहीत. आता जो त्रास उद्धव ठाकरेंना होत होता तोच त्रास नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणेंनाही व्हायला सुरु झालाय. खुद्द नितेश राणेंनीच ही माहिती दिलीय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंवर उपचार सुरु असताना हे आजारी सरकार आहे असं नारायण राणे म्हणाले होते पण आज त्यांच्याच मुलाला...नितेश राणेंना पाठिचा आणि मणक्याचा त्रास सुरु झालाय. हा तोच आजार आहे ज्यामुळे अनेक महिने उद्धव ठाकरेंना गळ्यात पट्टा लावावा लागला होता, बेडरेस्ट घ्यावी लागली होती. हाच त्रास आता नितेश राणेंना सुरु झालाय, आपल्या आजारपणाविषयी नितेश राणे पहिल्यांदाच खुलेपणानं बोलले, नितेश राणे म्हणाले की...