नोटापेक्षा कमी मतं पडतात तरी शिवसेना राज्याबाहेर का लढते? Shiv Sena Outside Maharashtra
 By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:46 IST2022-01-12T15:45:55+5:302022-01-12T15:46:57+5:30
प्रादेशिक पक्ष ही आपली ओळख पुसून टाकण्यासाठी शिवसेना आता झटतेय. उत्तरप्रदेश आणि गोवा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनं लढणार आहे. गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी युती आहे तर उत्तरप्रदेशमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार आहे. यापूर्वीही राज्याबाहेर हात-पाय पसरायचा प्रयत्न शिवसेनेनं केलाय. आता यावरुनच भाजपनं शिवसेनेला सणसणीत टोला हाणलाय. राज्याबाहेरच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचं डिपॉझिट जप्त होतं, पण डिपॉझिट जप्त झालं की ते भरायला शिवसेनेकडे पैसे येतात कुठून असा टोमणा शिवसेनेला भाजपनं लगावलाय. आता राज्याबाहेर शिवसेनेचं डिपॉझिट का जप्त होतं, आतापर्यंत कुठेकुठे शिवसेना लढलीय आणि त्यांच्या पदरी काय पडलंय? उत्तरप्रदेश, गोव्यात शिवसेनेला खरंच यश मिळेल का? यावरच बोलुयात पुढच्या ३ मिनिटात पण सगळ्यात आधी पाहुयात शिवसेना आतापर्यंत राज्याबाहेर कुठे कुठे लढलीय ते...