नारायण राणे समर्थकाने देवेंद्र फडणवीस यांची गोव्यात भेट का घेतली? Devendra Fadanvis | Rajan Teli
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:27 IST2022-01-04T14:27:38+5:302022-01-04T14:27:59+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक नारायण राणेंनी जिंकली... केंद्रीय मंत्री झाल्यानंतर राणेंनी पहिल्याच परीक्षेत जबरदस्त कामगिरी केली... पण नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे हे अद्यापही फरार आहेत... संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिस त्यांच्या मागावर आहेत.. त्यामुळे राणेंसाठी हा संघर्ष अद्याप तरी संपलेला नाही... दुसरीकडे नारायण राणे आपला विजयोत्सव साजरा करत असतानाच, राणेंच्या जिव्हारी लागणारा एक घाव, या निवडणुकीच्या निकालातून झाला... तोच घाव भरून काढण्यासाठी आता फडणवीस प्रयत्न करतायत का? अशी चर्चा सुरु झालेय... याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस याणि राणेंच्या कट्टर राणेसमर्थकांची झालेली भेट.. विशेष म्हणजे ही भेट गोव्यात झालेय.... राणेंचे कट्टर समर्थक फडणवीसांना का भेटले? यामागे नेमकी काय राजकीय गणितं आहेत, हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा....