Next

मिसेस मुखमंत्री जेव्हा RTO च्या रांगेत उभ्या राहतात...Rashmi Thackeray Vs Amruta Fadanvis

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 06:01 PM2022-01-07T18:01:38+5:302022-01-07T18:02:05+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या मुंबईच्या RTO ऑफिसमध्ये दाखल झाल्या आणि चक्क रांगेत उभ्या राहिल्या. रश्मी ठाकरेंना ड्रायव्हिंग लायसन्स काढायचा होता आणि त्यासाठी एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे त्या आरटीओच्या रांगेत उभ्या राहिल्या. कोणताही फेव्हर, कोणतीही मदत न घेता रश्मी ठाकरेंनी कागदपत्रं मिळवली... अशी एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. पण बातमी ही नाही. गंमत अशी आहे की हीच पोस्ट अमृता फडणवीसांच्या नावानंही व्हायरल होतेय. रश्मी ठाकरेंच्या जागी अमृता फडणवीसांचं नाव टाकण्यात आलंय, मुंबईच्या जागी नागपूर करण्यात आलंय, त्यामुळे आरटीओच्या रांगेत नेमकं कोण उभं होतं...रश्मी वहिनी की अमृतावहिनी....शिवसेना भवन पेजवरची पोस्ट खरी की पुन्हा नरेंद्र पुन्हा देवेंद्र पेजवरची पोस्ट खरी...का दोन्ही खोट्या.. यावरच बोलुयात पुढच्या २ मिनिटात पण सर्वात आधी पाहुयात रश्मी ठाकरेंबाबतच्या व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय. शिवसेना भवन नावाच्या लाखो फॉलोवर्स असणाऱ्या पेजवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली होती.