आर्यन खानला 26 दिवस कोठडीत ठेवणे हा कुठला न्याय ? Supriya Sule on Aryan khan Case
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 14:52 IST2021-11-02T14:52:10+5:302021-11-02T14:52:48+5:30
बहुचर्चित ड्रग्स पार्टी प्रकरणात स्टारपुत्र आर्यन खानला अटक झाल्यानंतर 26 दिवसांनी त्याची सुटका झाली..यादरम्यान तो काही दिवस तो एनसीबी कोठडीत तर काही दिवस न्यायालयीन कोठडीत होता..मुलाला लवकर जामीन मिळावा यासाठी शाहरुख खानने दिग्गज वकिलांची फौज देखील नेमली होती..परंतु तरीसुद्धा आर्यन खानला जामीन मिळवण्यासाठी 26 दिवस लागले..दरम्यानच्या कालावधीत केंद्र विरुद्ध राज्य या जुन्या वादाला पुन्हा नव्याने सुरवात झाली..राज्य सरकारचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक दररोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे कसे बोगस आहेत हे सांगतायत..मुंबई आणि बॉलिवूडला बदनाम करण्याचं कारस्थान केंद्र सरकार रचत असल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय..त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या वादात उडी घेतली..