Next

बायकोचा वाढदिवस विसरल्यास जेलची हवाकाय आहे कायदा? Act on Wife's Birthday

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 14:49 IST2021-11-12T14:48:14+5:302021-11-12T14:49:57+5:30

जर तुम्ही बायकोचा वाढदिवस विसरला तर काय होईल? बायको रागावेल, भांडण होईल, एक, दोन दिवस अबोला धरेल..फार फार तर चहा, जेवण मिळणार नाही..परंतु जगात एक असा देश आहे, ज्यात बायकोचा वाढदिवस विसरणाऱ्या नवऱ्याला थेट तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते... तसा कायदाच या देशात आहे आणि हाच कायदा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे... कोणता आहे हा देश आणि इथं असा कायदा का बनलाय... अशाच प्रश्नांची उत्तर या व्हिडीओतून तुम्हाला मिळणार आहेत. म्हणूनच हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा... एखाद्या देशाची संस्कृती, तिथल्या प्रशासनाच स्वरूप आणि कायदा सुव्यवस्थेची गरज लक्षात घेऊन कायदे तयार केले जातात.. मात्र काही कायदे हे वर्षानुवर्षे तसेच असतात.. ते कधीच बदलले जात नाही..त्यातीलच हा एक विलक्षण कायदा आहे...