Next

Malegaon Corporationच्या विरोधात अनोखी गांधीगिरी | Nashik | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 13:16 IST2021-09-13T13:16:26+5:302021-09-13T13:16:39+5:30

सुमारे साडेचारशे कोटींचे वार्षिक अंदाजपत्र असलेल्या मालेगाव महापालिका शहरातील नागरिकांना सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली असून पावसामुळे मालेगाव शहरातील रस्त्यांची मोठी दैना उडाली असून ठीक ठिकाणी रस्त्यावर पाण्याचे तळे साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार मागणी करून महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने मालेगाव आवामी पार्टीचे प्रमुख रिजवान बॅटरीवाला यांनी चक्क रस्त्यावर गाळात लोळून गांधीगिरी करीत महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.बॅटरीवाला यांचे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.बॅटरीवाला यांच्या या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होती.