Next

पुढच्या आठवड्यापासून Uddhav Thackeray यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, Kirit Somaiya कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 16:04 IST2022-01-12T16:03:41+5:302022-01-12T16:04:03+5:30

एका लाँग ब्रेकनंतर भाजप नेते किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदा आता पुन्हा चालू झाल्यात. पहिल्याच पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांनी आरोप केले ते मुंबईच्या कोव्हिड सेंटर्सवरुन. मुंबईच्या किशोरी पेडणेकरांसह स्टँडिंग कमिटी चेअरमन यशवंत जाधवांनी मिळून कोव्हिड घोटाळा केला असा गंभीर आरोप सोमय्यांनी लावलाय. सोमय्यांनी काय गंभीर आरोप लावलाय, घोटाळ्याची क्रोनोलॉजी काय सांगितलीय आपल्याला पाहचय पण त्याआधी पाहुयात सोमय्यांनी मुंबई महापालिकेलाच का निवडलं ते.