Next

'...तर राज्यपालांबाबत दोन हात करायलाच हवेत' | Bhaskar Jadhav | Devendra Fadnavis | Vidhan Sabha

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:15 IST2021-12-29T14:15:13+5:302021-12-29T14:15:40+5:30

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस.. पहिल्या दिवसापासून अधिवेशनात विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पाहायला मिळाली.. अनेक मुद्द्यांवर वाद झाले..सोमवारी सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली होती.. त्यानंतर भास्कर जाधव यांनी आज पुन्हा एकदा नितेश राणे प्रकरणावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.. महाभारतातील प्रसिद्ध डायलॉग सांगत 'तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म?' असं विचारत भाजपला खडेबोल सुनावले.. काय म्हणाले भास्कर जाधव पाहूयात..