Next

ठाकरेंना पूर्ण घेरलं..आता काही खरं नाही, एकाच दिवसात विक्रमी धाडी.. ED Raid On Shiv Sena | Thackeray

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 20:40 IST2022-03-08T20:40:00+5:302022-03-08T20:40:25+5:30

आतापर्यंत केंद्रीय यंत्रणा मातोश्रीजवळ पोहचल्या होत्या. संजय राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, त्यांच्या पत्नी हे सारे केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर आले होते. भावना गवळी, प्रताप सरनाईकही यंत्रणांच्या हिटलिस्टवर होते. ठाकरेंच्या खास माणसांना घेरण्यात आलं होतं. पण आता थेट उद्धव ठाकरेंना..मातोश्रीला घेरण्यात आलंय. एकाच दिवासात विक्रमी पद्धतीनं धाडी टाकण्यात आल्यात. केंद्रीय यंत्रणांनी फक्त उदधव ठाकरेच नाहीत तर आदित्य ठाकरेंच्या खास माणसांवरही धाडी टाकल्यात. इतकच काय तर अनिल परब यांची विश्वासू समजली जाणारी दोन माणसंही इनकम टॅक्सच्या रडारवर आली आण् त्यांच्यावर धाडी पडल्या. शिवसेनेच्या आतल्या गोटातली कोणकोणती खास माणसं यंत्रणांच्या रडारवर आलीयेत पाहुयात..