चहाची टपरी चालवून केला शिवसेनेचा प्रचार, पण वाट्याला दुःखद अंत का आला? Dattatraya Varhade Shiv Sena
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 16:28 IST2022-01-06T16:28:27+5:302022-01-06T16:28:44+5:30
१९६६ साली दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांच्या वाणीनं तेव्हा राज्यभरात अनेक निष्ठावंत शिवसैनिक तयार झाले. खणखणीत भाषण आणि सडेतोड स्वभावामुळे लाखो शिवसैनिक बाळासाहेबांसाठी जीव ओवाळून टाकण्यास तयार झाले. बाळासाहेबांनीही कधी शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडलं नाही. शिवसैनिकांमुळेच मी शिवसेनाप्रमुख आहे हे वाक्य ते नेहमी बोलून दाखवायचे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांचं प्रेमाचं नातं होतं. शिवसैनिक बाळासाहेबांना दैवत मानतात. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे..नेमकं काय घडलं पाहुयात.. उस्मानाबाद येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करणाऱ्या एका शिवसैनिकांनं आत्महत्या केलीय. दत्तात्रय वऱ्हाडे (Dattatraya Varhade) असं या शिवसैनिकाचं नाव... आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. वऱ्हाडे हे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे...