Next

आधी जिथे होते, समीर वानखेडेंना पुन्हा तिथेच पाठवलं | Sameer Wankhede Transfer News

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:36 IST2022-01-04T14:36:04+5:302022-01-04T14:36:37+5:30

समीर वानखेडे या नावाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं... केवळ राजकीय नेतेच नाही तर पदड्यावर हिरोगिरी करणाऱ्या बॉलिवूडकरांनीही वानखेडेंच्या नावाचा धसका घेतला होता. त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध वानखेडे असा सामना महाराष्ट्राने पाहिला.. मलिकांनी थेट वैयक्तिक मुद्द्यावर हात घालत वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लिम यावरच प्रश्न उपस्थित केला. आणि जो वाद उभा राहिला तो थांबता थांबत नव्हता... पण आता या वादावर पडदा पडणार आहे असं दिसतंय.. कारण समीर वानखेडेंनीच मुंबईत न थांबण्याचा निर्णय घेतलाय...