Next

सामूहिक बलात्कारानं पुणे हादरलं!; पीडिताचं वय अवघं १४ वर्ष | Pune Wanwadi Rape Case | Puner News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:32 PM2021-09-07T13:32:21+5:302021-09-07T13:32:41+5:30

पुण्यातून हादरवून टाकणारी बातमी पुढे आलीये. पुण्यात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडलीये. पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून आठ जणांच्या टोळक्यानं तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आठही आरोपींना अटक केलीये. आठ आरोपींपैकी सहा ऑटोचालक आणि दोन रेल्वे कर्मचारी आहेत.